बेकायदा मद्यविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:41+5:302021-06-16T04:13:41+5:30

येथील मुख्य एनडीए रस्त्यावर हे वाइन शॉप असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ...

Action against both in illegal liquor sale case | बेकायदा मद्यविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई

बेकायदा मद्यविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई

येथील मुख्य एनडीए रस्त्यावर हे वाइन शॉप असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास मनाई आदेश आहेत.

रविवारी या ठिकाणी वाइन शॉपमधील कामगार मद्यविक्री करत असल्याचे आढळून आले. यामुळे दुकानासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्याबद्दल पोलिसांना तक्रार करण्यात आली. यावेळी पोलिसांनी देविदास विनायक राठोड (वय २९, रा. करण क्लासिक, वारजे पुलाजवळ) याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा यानुसार कारवाई केली.

दुसरी घटना याच परिसरात रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घडली. संगीता रंजितसिंग बल (वय २८, रा. पवार बिल्डिंग, लेन ३, तपोधाम) ही महिला विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्य चढ्या दराने विक्री करीत असल्याचे आढळले.

त्यामुळे देखील या रस्त्यावर खरेदी करणाऱ्या लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून सदर आरोपी महिलेस ताब्यात घेतले व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ प्रमाणे कारवाई केली. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासणीत अगदी किरकोळ मद्यसाठा आढळून आल्याने याबाबत आश्चर्यही व्यक्त होत आहे.

फोटो ओळ :- रविवारी वीकेंड लॉकडाऊनमध्ये बेकायदा मद्यविक्री केल्याने झालेली गर्दी.

Web Title: Action against both in illegal liquor sale case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.