पशुसंवर्धन पदविकाधारकांवरील कारवाई मागे घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:17+5:302021-07-20T04:09:17+5:30
याबाबत पशुचिकित्सक संघटना इंदापूर तालुका यांच्यावतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना डॉ. शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे. ...

पशुसंवर्धन पदविकाधारकांवरील कारवाई मागे घ्यावी
याबाबत पशुचिकित्सक संघटना इंदापूर तालुका यांच्यावतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना डॉ. शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले की, राज्यातील पशुसंवर्धन विभागामध्ये पशुधन पर्यवेक्षक पदावर चार हजार ५०० पशुचिकित्सक श्रेणी २ च्या दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय सुविधा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन सेवा देतात. तसेच राज्यामध्ये ७० हजार पशुचिकित्सक कर्मचारी खासगी दूधसंघ दुग्ध व पशुसंवर्धन उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी सेवा बजावतात. तरी शासनाने सर्व मागण्या मान्य कराव्यात. इंडियन व्हेटर्नरी कौन्सिल १९८४- ३० (ख) या कायद्याच्या अनुषंगाने लघुपशुवैद्यकीय सुविधा राज्यभरामध्ये ग्रामीण भागामध्ये पशुधनासंबंधी माहिती पुरवतात. सध्या राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पशुचिकित्सकांचे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा त्यांनी या वेळी जाहीर केला.
याशिवाय राज्यातील सर्व खासगी पशुचिकित्सकांची तत्काळ नोंदणी करून नोंदणीकृत व्यवसाय करण्याकरिता परवानगी उपलब्ध करावा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तसेच राज्य पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर यांच्याकडून दुग्धव्यवसाय व्यवस्थापन पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व पशुनोंदणी करून नोंदणीकृत व्यवसाय परवाना मिळावा, राज्य दुग्धव्यवसाय व्यवस्थापन पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची महामंडळ स्थापन करून त्यांच्या विविध प्रश्नांबाबत तत्काळ राज्य शासनाकडून समितीची नेमणूक करण्यात यावी, राज्यातील पशुधन पर्यवेक्षक पदाची तत्काळ भरती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.