लॉकडाऊनकाळात नियमभंगाबद्दल ५७१ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:13 IST2021-04-28T04:13:08+5:302021-04-28T04:13:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वयंशिस्तीचे पालन केले ...

Action against 571 persons for violation of rules during lockdown | लॉकडाऊनकाळात नियमभंगाबद्दल ५७१ जणांवर कारवाई

लॉकडाऊनकाळात नियमभंगाबद्दल ५७१ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वयंशिस्तीचे पालन केले जात आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा न उगारता समज देण्यावर भर दिला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गेल्या २३ दिवसांत ५७१ जणांवर १८८ नुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले.

गेल्या वर्षी सर्वप्रथम मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी कडक धोरण स्वीकारले होते. या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला. जागेवरच शिक्षा केल्या. तसेच नियमभंग करणाऱ्या २७ हजारांहून अधिक जणांवर १८८ प्रमाणे कारवाई केली होती.

सध्या पोलिसांनी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यावर भर दिला आहे. तसेच सकाळी ११ नंतर विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. शहरातील कोरोनावाढीचे दररोजचे वाढते आकडे पाहून लोकांनी स्वत: बंधने घालून घेतल्याने सध्या पोलिसांनीही कडक धोरण न स्वीकारता लोकांना समजावत आहेत. त्याच वेळी पोलिसांच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशारा याचबरोबर दिला जात आहे.

Web Title: Action against 571 persons for violation of rules during lockdown