शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नाणेकरवाडीतील कंपनीत पूर्व वैमनस्यातून कामगारावर अ‍ॅसिड हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 20:29 IST

भांडणाचा राग मनात धरून दोन कामगारांनी सहकारी कामगारावर अ‍ॅसिड ओतून त्याला जखमी केले.

ठळक मुद्देहेल्पर म्हणून काम करणाऱ्या दोन कामगारांवर गुन्हा दाखल,

चाकण : नाणेकरवाडी ( ता.खेड ) गावच्या परिसरात सुपर एॅटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत दोन कामगारांनी भांडणाचा राग मनात धरून सहकारी कामगारावर अ‍ॅसिड ओतून त्याला जखमी केले. याप्रकरणी दोन कामगारांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ही घटना मंगळवारी ( दि. २२ ) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुपर एॅटो कंपनीत घडली. या घटनेत अजय श्रीहरिशंकर मिश्रा (वय २६, रा. अनुसया बिल्डिंग, जंबुकरवस्ती, नाणेकरवाडी, चाकण ) या जखमी झालेल्या कामगाराने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या रवी भगत व बबन भगत (दोघेही रा. नाणेकरवाडी, चाकण ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे सुपर एॅटो कंपनीत रात्रपाळीत काम करणारा कामगार अजय मिश्रा हा कंपनीच्या केबिनमध्ये काचा उघड्या ठेवून विश्रांती घेत असताना सात-आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यासोबत काम करणाऱ्या हेल्पर रवी व बबन यांनी कंपनीतील पेंट धुण्यासाठी लागणाऱ्या अ‍ॅसिडची बाटली अजयच्या अंगावर ओतून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अजय याच्यावर चाकण येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी कंपनीत वापरत असलेले अ‍ॅसिडचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. सदरचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. ===============================================

टॅग्स :KhedखेडCrimeगुन्हाPoliceपोलिस