चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST2021-05-03T04:07:26+5:302021-05-03T04:07:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला बोपदेव घाटात नेऊन तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करत तिला जखमी ...

Acid attack on wife on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला बोपदेव घाटात नेऊन तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करत तिला जखमी करणाऱ्या पतीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

दिनेश शिरपत धुमक (वय २९, रा. बावधन गाव) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. पिसोळी येथे राहणार्‍या ३७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी दिनेश हे पतीपत्नी आहेत. शनिवारी सकाळी दिनेश याने पत्नीला त्याच्या दुचाकीवरुन बोपदेव घाटात नेले. घाटात गाडी थांबवून तुझे कामाचे ठिकाण कोठे आहे, दाखव, असे म्हणाला. फिर्यादीने तिच्या कामाचे ठिकाण दाखविण्यास नकार दिला असता त्याने तिला तू कशी काम करते तेच बघतो, अशी धमकी दिली. तुझा चेहरा पहायचा आहे, असे सांगून मास्क खाली करण्यास सांगितले. तिने मास्क खाली केल्यावर त्याने बाटलीतून आणलेले अ‍ॅसिड तिच्या चेहऱ्यावर फेकले. या अ‍ॅसिड हल्ल्यात पत्नीच्या डोळ्याच्या वरती व डाव्या दंडावर भाजून जखम झाली आहे. कोंढवा पोलिसांनी दिलेशला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Web Title: Acid attack on wife on suspicion of character