वैमानिक अभ्यासक्रमास मिळाला टेक ऑफ!
By Admin | Updated: July 9, 2014 23:39 IST2014-07-09T23:39:53+5:302014-07-09T23:39:53+5:30
(वैमानिक) अभ्यासक्रमाचे शुल्क विद्याथ्र्याना परवडत नसल्याने हा अभ्यासक्रम बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

वैमानिक अभ्यासक्रमास मिळाला टेक ऑफ!
पुणो : पुणो विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे गेल्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या एम.टेक एव्हिएशन (वैमानिक) अभ्यासक्रमाचे शुल्क विद्याथ्र्याना परवडत नसल्याने हा अभ्यासक्रम बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु,विद्यापीठाने अमेरिकेतील फ्लोरिडा, मायामी येथील डीन इंटरनॅशनल एव्हिएशन स्कूल कंपनीशी करार केल्यामुळे 7क् लाखांचे शुल्क 3क् लाखांवर आले आहे.
विद्यापीठाने गेल्या शैक्षणिक वर्षात एव्हिएशन क्षेत्रत आघाडीवर असलेल्या जर्मनीतील एका नामांकित कंपनीशी करार केला होता. परंतु, या कंपनीकडून आकारले जाणारे शुल्क विद्यार्थी व पालकांच्या खिशाला परवडणारे नव्हते. विद्याथ्र्याना वैमानिक अभ्यासक्रमाचे शुल्क भरणो शक्य व्हावे, यासाठी विद्यापीठाने बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याचा फारसा फायदा झाला नाही. परिणामी, 2क् जागांवर केवळ 6 विद्याथ्र्यानी प्रवेश घेतला होता. त्यामुळे विद्यापीठाने अमेरिकेतील डीन इंटरनॅशनल एव्हिएशन स्कूल कंपनीशी करार केला.
पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, की विद्यापीठातर्फे गुणवत्तापूर्ण वैमानिक अभ्यासक्रम शिकविला जावा. या उद्देशाने विद्यापीठाने जर्मनीतील नामांकित कंपनीशी करार केला. परंतु,या अभ्यासक्रमासाठी विद्याथ्र्याना 6क् ते 7क् लाख शुल्क भरावे लागणार होते. सर्वच विद्याथ्र्याना हे शुल्क परवडत नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी 6 विद्याथ्र्यानी या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. प्रवेश घेणा:या सर्व विद्याथ्र्याना या अभ्यासक्रमाचे शुल्क भरणो शक्य व्हावे. यासाठी विद्यापीठाने अमेरिकेतील डीन इंटरनॅशनल एव्हिएशन स्कूल कंपनीबरोबर करार केला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे शुल्क 3क् लाखांवर आले आहे.
डॉ. गाडे म्हणाले, की एव्हिएशन अभ्यासक्रमासाठी विमान उडविण्याचे प्रशिक्षण देणा:या नामांकित कंपनीबरोबर करार करणो आवश्यक होते. त्यासाठी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विज्ञानशाखेचे अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर व डॉ. एस. आय. पाटील यांनी अमेरिकेतील विविध वैमानिक प्रशिक्षण देणा:या कंपन्यांशी संपर्क साधला. त्यांनी अमेरिकेतील डीन इंटरनॅशनल एव्हिएशन स्कूलची निवड केली. त्यावर या कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाला भेट देऊन अभ्यासक्रमाबाबत चर्चा केली. आता या कंपनीशी करार करून विद्यापीठाने वैमानिक अभ्यासक्रमाचे शुल्क कमी झाले आहे.
विद्यापीठाने अमेरिकेतील कंपनीशी करार करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही, असे स्पष्ट करून गाडे म्हणाले, की विद्यापीठात प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याना त्यांच्या पसंतीनुसार अमेरिकेत किंवा जर्मनीत प्रशिक्षण घेण्यासाठी जाता येणार आहे. गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यापैकी एक विद्यार्थी जर्मनीत, तर पाच विद्यार्थी अमेरिकेत जाणार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये वैमानिक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणारे अभ्यासू प्रशिक्षक आहेत.
बहि:स्थची नोंदणी
1 ऑगस्टपासून
4पुणो विद्यापीठात बहि:स्थ अभ्यासक्रास नव्याने प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याचे अर्ज येत्या 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात स्वीकारले जातील. यामध्ये बी. ए, बी. कॉम, एम. ए, एम. कॉम या अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्यानी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरावेत, तर पुनर्परीक्षार्थी विद्याथ्र्यानी एमकेसीएलच्या संकेतस्थळावरून 11 जुलै ते 14 ऑगस्ट या कालावधीत अर्ज भरावेत.