पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने केला मुलीचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:35 IST2021-01-08T04:35:33+5:302021-01-08T04:35:33+5:30

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन सुभाष कदम (वय ४५, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या गुन्हेगारांच्या विरोधात ...

The accused, who escaped on parole, raped the girl | पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने केला मुलीचा भंग

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने केला मुलीचा भंग

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन सुभाष कदम (वय ४५, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या गुन्हेगारांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम याच्यावर लोणी स्टेशन येथील एका गुन्हेगाराचा खून केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी फरार झाला. त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

गुरुवार दुपारी १२.३० च्या सुमारास पीडित मुलगी एकटीच घरी असल्याचे पाहून सचिन कदम मुलीच्या घरात घुसला. त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबधित मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता कदम याने संबधित मुलीचे तोंड हाताने दाबले. तसेच तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. मात्र, मुलीने सचिन याच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करताच त्याने पळ काढला. आरोपीने घऱातून पळून जाताना पीडित मुलीच्या घऱाबाहेरील दुचाकीचा आरसा फोडला.

तो दूर गेल्यानंतर मुलीने नातेवाईकांशी फोनवन संपर्क साधुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नातेवाईकांनी तत्काळ लोणी काळभोर पोलिसात जाऊन कदम याच्या विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करत आहेत.

Web Title: The accused, who escaped on parole, raped the girl