पाटेठाण : राहू (ता.दौंड) येथे दोन गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आरोपी तुषार तात्या काळे (रा.वाळकी,ता.दौंड) )हा राहू येथे गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. सोमवार (दि. 9) रोजी तुषार काळे हा सायंकाळच्या सुमारास एका हॉटेलच्या ठिकाणी आला असता पोलिसांनी त्याची झडती घेतल्यावर २ गावठी पिस्तूल मिळून आले असल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस हवालदार सचिन घाडगे,अजित भुजबळ,अजय घुले,विजय कांचन,गुरू जाधव,धिरज जाधव,अक्षय सुपे यांचे पथकाने केली आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करत आहेत.
दौंड तालुक्यात गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2023 13:13 IST