जामिनावरील आरोपीने पकडले फरारीला

By Admin | Updated: August 25, 2014 05:31 IST2014-08-25T05:31:28+5:302014-08-25T05:31:28+5:30

फरार असलेल्या आरोपीला त्याच गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या दुसर्‍या आरोपीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार रविवारी भोसरी एमआयडीसी येथे घडला

The accused was caught on bail by the accused | जामिनावरील आरोपीने पकडले फरारीला

जामिनावरील आरोपीने पकडले फरारीला

>पिंपरी : फरार असलेल्या आरोपीला त्याच गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या दुसर्‍या आरोपीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार रविवारी भोसरी एमआयडीसी येथे घडला.
शिवकुमार हिरेमठ (रा. परभणी) असे फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरेमठ व त्याचा साथीदार परभणी येथे एका ऑनलाइन विक्री करणार्‍या कंपनीत कामास होते. दोघांनी कंपनीमार्फत अनेकांना गंडा घातला. हिरेमठच्या साथीदाराला अटक केली, तर हिरेमठ परभणी येथून फरार होऊन भोसरीत आला. दरम्यान, हिरेमठच्या साथीदाराची जामिनावर मुक्तता झाली. हिरेमठ भोसरीत असल्याचे त्याला समजले. त्यानंतर साथीदाराने हिरेमठला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The accused was caught on bail by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.