अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस उत्तर प्रदेशातून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:49+5:302021-07-20T04:09:49+5:30
पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पळून गेलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील फत्तेहपूर येथे जाऊन जेरबंद केले ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस उत्तर प्रदेशातून जेरबंद
पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पळून गेलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील फत्तेहपूर येथे जाऊन जेरबंद केले आहे.
अमितकुमार सूरज पाल (वय २१, रा. भिलारी, जि. फत्तेहपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात २ जुलै रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अंमलदार प्रणव संकपाळ व शिवदत्त गायकवाड यांना यातील आरोपी हा उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाली.
सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, प्रणव संकपाळ, शिवदत्त गायकवाड यांचे पथकाने फत्तेहपूर येथे जाऊन अमितकुमार पाल याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.