शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला पाहिजे होता लग्नासाठी जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 03:53 IST

न्यायालयाने मात्र अर्ज फेटाळला; लग्न पडले लांबणीवर

पुणे : साहेब, माझे २० डिसेंबरला लग्न आहे. त्यामुळे मला काही दिवसांसाठी जामीन द्यावा, लग्न झाल्यानंतर मला पुन्हा कोठडीत ठेवावे, असा अर्ज चक्क एका आरोपीने न्यायालयाकडे केला आहे. बीअरबारवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक झालेल्या या आरोपीचा अर्ज न्यायालयाने मात्र फेटाळला आहे.शुभम नितीन काळभोर (वय १९, मोरेवस्ती, चिखली) असे लग्न ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा १५ डिसेंबरला साखरपुडा, तर २० डिसेंबरला लग्न आहे. मात्र लग्नासाठी अशा प्रकारचा जामीन देता येणार नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कºहाळे यांनी त्याचा जामीन फेटाळला. याबाबत सविस्तर माहिती अशी, काळभोर त्यांच्या साथीदारांसह २ डिसेंबर रोजी त्रिवेणीनगरमधीलएका बीअरबारवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्याला चिखली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल आहे.या प्रकरणात जामीन मिळावा, म्हणून त्याने अर्ज केला होता. मात्र तो अर्ज प्रलंबित असतानाच त्याने लग्नासाठी तात्पुरता जामीन मिळावा, म्हणून दुसरा अर्ज केला आहे. माझे २० डिसेंबरला लग्न असून १५ डिसेंबरला साखरपुडा होणार आहे. दोन्ही कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे. लग्नाच्या पत्रिकादेखील छापल्या आहेत. जामीन मिळाला नाही तर सर्व खर्च वाया जाईल, असे त्याने केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्याने केलेल्या अर्जाला विरोध करीत अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवाद केला, की तात्पुरता जामीन देण्यासाठी आरोपीने दिलेले कारण कायदेशीरदृष्ट्या चालणार नाही. तसेच आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून परिसरात त्यांची दहशत आहे. काळभोर हा सराईत गुन्हेगार असून जामीन मिळाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा.जामिनासाठी आईचे प्रतिज्ञापत्रशुभम हा रिक्षाचालक आहे. त्याला लग्नासाठी जामीन मिळावा, म्हणून त्याच्या लग्नाच्या पत्रिका न्यायालयात सादर करण्यात आल्या होत्या.तसेच त्याच्या आईने प्रतिज्ञापत्रदेखील दिले होते. या प्र्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.

टॅग्स :Arrestअटकmarriageलग्न