बलात्कारातील आरोपी; आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: May 20, 2014 23:25 IST2014-05-20T23:25:04+5:302014-05-20T23:25:04+5:30
पाच वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केलेल्या नराधमास गुन्हे शोध पथकाने २४ तासांत उघडकीस आणले आहे

बलात्कारातील आरोपी; आत्महत्येचा प्रयत्न
लोणी काळभोर : रविवार (दि. १८) लोणी स्टेशन परिसरातील पाच वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केलेल्या नराधमास गुन्हे शोध पथकाने २४ तासांत उघडकीस आणले आहे. या कृत्याचे तणाव आल्याने त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालय पुणे येथे उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक अभिमान पवार यानी दिलेल्या माहितीनुसार धनंजय जगन्नाथ खेसे (वय ३0 रा. नायगाव, सदोबाचीवाडी, ता.पुरंदर) याने हे कृत्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचा विवाह २९ डिसेंबरला झाला होता. अवघ्या तीन महिन्यातच १0 मार्च २0११ त्याची पत्नी जयश्री हिने त्याच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याने त्याच्यावर जेजूरी पोलीस ठाण्यात त्याचे सासरे आप्पा ढोपरे यानी मुलीस मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार केल्यामुळे त्यास अटक झाली होती. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत पिडीत मुलगी ज्या इमारतीत रहात होती तेथील पुवीर्चा सुरक्षारक्षक आप्पा ढोपरे याचेकडे सखोल चौकशी केली असता त्यानी वरील माहीती पोलीसाना दिली तसेच अजूबाजूला चौकशी केली असता तेथील रहिवाश्यानी दिलेले वर्णन हे फियार्दीने दिलेल्या वर्णनाशी मिळत असलेने गुन्हे शोध पथक धनंजय याचे मुळ गाव नायगाव,सदोबाची वाडी येथे गेले.तो तेथे मिळून न आलेने मिळालेल्या माहितीवरून त्याची बहिन गोटेमाळ, खळद (ता पुरंदर) येथे असलेचे समजले. पथक तेथे पोहोचले तेव्हा तेथे धनंजय येथे आला होता त्याने19 मे रोजी सकाळी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याला ऊपचारासाठी पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल केल्याचे समजलेने पोलीस पथक तेथे गेले. तेथे त्याची बहिन प्रतीभा कामठे हिने पोलीसाना धनंजय याने मी माझी सासुरवाडी लोणी काळभोर येथे गेलो होतो तेथील एका लहान मुलीस शेजारच्या शेतात नेवून बलात्कार केला व तिला तेथेच सोडले याचे टेन्शन आलेने मी विष पिलो आहे असे सागीतल्यची माहिती दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ हे करत आहेत. (वार्ताहर)