अल्पवयीन मुलीच्या खुनातील आरोपीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST2020-12-13T04:28:14+5:302020-12-13T04:28:14+5:30

चाकण : गोणवडी येथील अल्पवयीन युवतीच्या खुनातील फरारी आरोपी माऊली याने मुलीच्या घरामागील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची ...

Accused of murdering minor girl commits suicide | अल्पवयीन मुलीच्या खुनातील आरोपीची आत्महत्या

अल्पवयीन मुलीच्या खुनातील आरोपीची आत्महत्या

चाकण : गोणवडी येथील अल्पवयीन युवतीच्या खुनातील फरारी आरोपी माऊली याने मुलीच्या घरामागील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.

माऊली (वय १८, रा.गोनवडी,ता.खेड, जि. पुणे,मूळ रा. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या फरारी आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोनवडी येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. या घटनेत माऊलीवर संशय होता. घटनेनंतर तो फरार झाला होता. शुक्रवारी (दि ११) गावातील काही लोकांना खून झालेल्या मुलीच्या घरामागील झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले.

गोनवडी येथील पडीक जमिनीमध्ये जनावरे राखताना संबधित अल्पवयीन मुलगी व माऊली यांच्यात टोकाची भांडणे झाली होती. त्याच रागातून त्याने तिच्या गळ्यावर लाकडी काठी दाबून तिचा खून केला होता. या घटनेनंतर माऊली फरार झाला होता. मृत अल्पवयीन मुलीच्या लहान बहिणीने ही माहिती घरातील लोकांनी दिली होती. त्यानंतर पोलिस माऊलीचा शोध घेत होते. पण शुक्रवारी त्याचा मृतदेह मुलीच्या घराच्या मागे आढळला.

Web Title: Accused of murdering minor girl commits suicide