तरुणाच्या खुनातील आरोपी अटकेत
By Admin | Updated: July 8, 2014 23:01 IST2014-07-08T23:01:06+5:302014-07-08T23:01:06+5:30
यवत येथे दलित तरुणावर जीवघेणा हल्ला करून मागील दीड महिन्यापासून फरारी असलेल्या दोन आरोपींना पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.

तरुणाच्या खुनातील आरोपी अटकेत
यवत : यवत येथे दलित तरुणावर जीवघेणा हल्ला करून मागील दीड महिन्यापासून फरारी असलेल्या दोन आरोपींना पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. आबा प्रल्हाद दोरगे व अमर चोरगे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यवतमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या वादातून दलित तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता. सदर घटना दि. 22 मे रोजी घडली होती. मागील काही दिवसांपूर्वी यातील दोन आरोपींना पकडल्यानंतर ते अज्ञान असल्याने बालसुधारगृहात त्यांना ठेवण्याचे आदेश संबंधित न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आरोपी आबा दोरगे व अमर चोरगे यांच्यासह एक अनोळखी आरोपी फरारी होते. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रय} केले होते. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
आज पहाटेच्या सुमारास सदर फरारी आरोपी उरुळी कांचन येथे येणार असल्याची माहिती दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, यवतचे पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार बाळासाहेब जाधव, पोलीस नाईक बाळासाहेब गाडेकर, श्रवण ग्रुपचे संतोष पंडित, रूपेश नावडकर, बाळासाहेब झगडे यांनी सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.