मांढरदेवी खून प्रकरणातील आरोपीला लाकडीत अटक
By Admin | Updated: November 22, 2014 23:22 IST2014-11-22T23:22:21+5:302014-11-22T23:22:21+5:30
मांढरदेवी मंदिराजवळ गुरुवारी (दि. 2क्) भारती कादर भोसले (वय 16) या अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खुन केलेला मृतदेह आढळून आला.

मांढरदेवी खून प्रकरणातील आरोपीला लाकडीत अटक
बारामती : मांढरदेवी मंदिराजवळ गुरुवारी (दि. 2क्) भारती कादर भोसले (वय 16) या अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खुन केलेला मृतदेह आढळून आला. या प्रकरणातील आरेापी देवीचंद जगू भोसले (वय 49, रा. सुरूर कवठे, ता. वाई, जि. सातारा) याला लाकडी (ता. इंदापूर) येथून बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
हा खून कौटुंबिक वादातून झाल्याने आरोपी भोसले यांच्याविरुद्ध वाई पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो लाकडी (ता. इंदापूर) येथे आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संभाजी कदम यांना मिळाली.
अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल जाधव, पोलीस हवालदार शिवाजी निकम, अशोक पाटील, बाळू भोई, अनिल काळे, रविराज कोकरे, मारुती हिरवे, संदीप मोकाशी, संदीप कांरडे, ज्ञानदेव साळुंखे, सदाशिव बंडगर यांच्या पथकाने छापा टाकून भोसले याला पकडले. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आले.
आरेापी भोसले याच्यावर याआधीही खून, दरोडे, घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
(प्रतिनिधी)