शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएला तपास हस्तांतरीत करण्यास आरोपी आव्हान देऊ शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 01:23 IST

एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य शासनाने विरोध केला आहे.

पुणे : एल्गार परिषदेबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांनी जवळजवळ पूर्ण करीत आणला आहे़ त्यामुळे आता या गुन्ह्यात पुढील तपास करण्यासारखे काही राहिलेले नाही़ हा राजकीय मुद्दा झाला असून एनआयएकडे हा तपास गेल्यास आरोपींकडून त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असे मत आरोपींच्या वकिलांनी व्यक्त केले आहे़एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य शासनाने विरोध केला आहे़ केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आरोपी सर्वोच्च न्यायालयात अथवा उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात़ आरोपींचे वकील अ‍ॅड़ रोहन नहार यांनी सांगितले, दोन वर्षांत पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना प्रचंड कागदपत्रे जमा केली़ २५ टेराबाईट इलेक्ट्रॉनिक पुरावा जमा केला़ तपास जवळजवळ संपलेला असून यात १० हजार पानांहून अधिक कागदपत्रांचे दोषारोपपत्रही दाखल झाले़ खटला प्रत्यक्ष सुनावणीच्या टप्प्यावर असताना तपास नव्या एजन्सीकडे देण्याने खटला रेंगाळू शकतो.त्यामुळे आरोपींकडूनही केंद्राच्या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते़ अ‍ॅड़ गौरव जाचक यांनी सांगितले, एनआयए अथवा राज्य शासनाकडून अजूनही न्यायालयात तपास हस्तांतरीत केल्याची कोणतीही कागदपत्रे दाखल करण्यात आलेली नाहीत़ एनआयएसाठी एक न्यायालय पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात निर्धारित करण्यात आले आहे़ त्यामुळे आता या खटल्याचे कामकाज पुण्यातील कोर्टात चालणार की, मुंबईतील हे अजूनही स्पष्ट नाही़ सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणाचा तपास करीत असून मंगळवारी ते मुंबईत गेले होते़ एल्गार परिषदेच्या तपासाबाबत त्यांना पोलीस महासंचालकांनी बोलविण्यात आले होते, असे समजते़१० हजार पानांचे २ दोषारोपपत्रएल्गार परिषदेच्या या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी सुमारे १० हजार पानांचे २ दोषारोपपत्र न्यायालयात सादर केली आहेत़ तसेच आरोपींकडून २५ टेराबाईट इतका इलेक्ट्रॉनिक पुरावा हस्तगत केला आहे़ त्यापैकी १६ टेराबाईट पुरावा त्यांनी न्यायालयात सादर केला असून त्याची क्लोन कॉपी आरोपींना दिली आहे़ वरावरा राव यांच्याकडून जप्त केलेली एक हार्ड डिस्क ओपन होत नाही़ त्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेणार आहे़

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा