साकोरे येथी जेष्ठ महिलेचा खून करणारा आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:51+5:302020-12-06T04:10:51+5:30

जानकुबाई अर्जुन चोरे (वय ६५, रा साकोरी चोरे मळा) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. अर्जुन शुभनारायण प्रसाद (वय ...

Accused of killing a senior woman at Sacore Gajaad | साकोरे येथी जेष्ठ महिलेचा खून करणारा आरोपी गजाआड

साकोरे येथी जेष्ठ महिलेचा खून करणारा आरोपी गजाआड

जानकुबाई अर्जुन चोरे (वय ६५, रा साकोरी चोरे मळा) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. अर्जुन शुभनारायण प्रसाद (वय २७ मुळ रा खबशी ता बनीयापुर छप्रा जि सारंग राज्य बिहार) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (दि ४) सकाळी १० वाजता जानकुबाई चोरे यांना अर्जुन शुभनारायण प्रसाद याने सेंट्रीगच्या कामाकरिता दुचाकीवरून बसून तो राहत असलेल्या खोलीत आणले. यावेळी त्णत्याने तीक्ष्ण हत्याराने चोरे यांच्या डोक्यावर मारुन त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन संशय येऊ नये म्हणून घरास कुलुप लावून पलायन केले. सायंकाळी जानकुबाई चोरे घरी न आल्याने नातेवाईकांनी बाम्हणमळा येथील अर्जुन प्रसाद राहत असलेल्या घरी जात पाहिले असता घरास कुलुप होते. खिडकीतून आत डोकावून पाहीले असता त्यांना आतमध्ये जानकुबाई चोरे या मृतावस्थेत दिसल्या. आळेफाटा पोलिसांनी याप्रकरणी अर्जुन प्रसाद याचेविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

पोलीस आणि गुन्हे अन्वेशनच्या पथकाने आरोपीकडील मोबाईल लोकेशनचा अंदाज घेत नाशिक रेल्वेस्थानकातून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर पवार करत आहेत.

Web Title: Accused of killing a senior woman at Sacore Gajaad