अपहरण, बलात्कार गुन्ह्यातील आरोपी १२ वर्षानंतर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST2021-01-01T04:08:20+5:302021-01-01T04:08:20+5:30
पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून नाशिकला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या गुन्ह्यात एक आरोपी गेले ...

अपहरण, बलात्कार गुन्ह्यातील आरोपी १२ वर्षानंतर गजाआड
पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून नाशिकला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या गुन्ह्यात एक आरोपी गेले १२ वर्षे फरार होता. वानवडी पोलिसांनी त्याला नाशिकहून अटक केली.
अविनाश ऊर्फ अभिजित मधुकर उघाडे (वय ३५, रा. प्रशांत अपार्टमेंट, नाशिक) असे त्याचे नाव आहे. ही घटना २००८ मध्ये घडली होती. मुकेश चव्हाण याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले होते. मुकेश चव्हाण, नागेश कांबळे (रा. पुणे) यांना २००८ मध्ये अटक केली होती. उघडे हा नाशिक येथे राहणारा असल्याचे गेल्या १२ वर्षापासून पोलिसांना चकवा देत होता. वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुरव यांना उघडे याच्याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाशिक येथून अविनाश उघडे याला अटक केली.