तलाठय़ासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 29, 2014 00:10 IST2014-11-29T00:10:40+5:302014-11-29T00:10:40+5:30
मूळ जागामालकाच्या नावाची नोंद सातबारा उता:यावरून कमी करून त्या जागी दुस:याच व्यक्तीचे नाव लावण्यासाठी बनावट दस्त तयार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

तलाठय़ासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणो : मूळ जागामालकाच्या नावाची नोंद सातबारा उता:यावरून कमी करून त्या जागी दुस:याच व्यक्तीचे नाव लावण्यासाठी बनावट दस्त तयार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हा बनावट दस्त तयार करण्यासाठी मदत करणा:या तलाठय़ासह दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनीष रमेश कुलकर्णी (रा. महात्मा सोसायटी, कोथरूड) व एस. बी. टांकसाळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी म. न. अकलुजकर (वय 83, रा. प्रियम बंगला, महात्मा सोसायटी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. यातील टांकसाळे हे कोथरूडचे तलाठी
होते. अकलुजकर यांनी दिलेल्या जबाबानुसार, ते पत्नी वैजयंती
व मुलगी शर्मिला यांच्यासह
राहतात.
महात्मा सोसायटीत त्यांचा दुमजली बंगला असून, तळमजला त्यांच्या स्वत:च्या नावावर आहे. तसेच बंगल्याचे टेरेसही त्यांच्याच नावावर, तर पहिला मजला पत्नीच्या नावे आहे.
त्यांनी पत्नीच्या सहमतीने 2क्क्7 साली बंगल्याचा पहिला मजला कुलकर्णी यांना विकला होता. त्या वेळी झालेल्या करारानुसार कुलकर्णी यांनी सोसायटीचे सभासदत्व मिळवून जागा हस्तांतरित करून घेणो आवश्यक होते. यासर्व अटींची पूर्तता केल्याचे त्यांनी अकलुजकर यांना सांगितल्यामुळे कुलकर्णी यांना तेथे राहण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, कुलकर्णी यांनी सोसायटीचे सभासदत्व मिळवण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांना वकिलामार्फत नोटीस देण्यात आली. यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला.
त्यानंतर 19 डिसेंबर 2क्क्9 रोजी त्यांना कोथरूडच्या तलाठी कार्यालयामधून सातबारा फेरफार संबंधी नोटीस आली. कुलकर्णी यांचे नावे फेरफारविषयी काही आक्षेप आहे अगर कसे, असे कळवण्यासंदर्भात ती नोटीस होती. या नोटिसीला उत्तर देत त्यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर हे प्रकरण हवेलीच्या तहसीलदारांकडून कोथरूडच्या मंडल अधिका:यांकडे वर्ग करण्यात आले. मंडल अधिका:यांपुढे 16 ऑक्टोबर 2क्1क् रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांना एक दस्त दाखवण्यात आला. त्यामध्ये त्यांच्या पत्नीची सही होती.
सातबारा नोंदीमधून नाव कमी करण्यासाठी अर्ज व दस्त दिलेला नसतानाही खोटय़ा सह्या करून, हा अर्ज तयार करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुलकर्णी यांनी तलाठी टांकसाळे यांना पत्र दिल्याचे भासवले असले, तरीदेखील या दस्ताचा मजकूर टांकसाळे यानेच त्याच्या हस्ताक्षरात लिहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कुलकर्णीचे नाव सातबारा उता:यावर चढवण्यासाठी या दोघांनी मिळून अन्य आरोपींच्या मदतीने खोटा व बनावट दस्त बनवला. तसेच, पुढील सुनावणीच्या दाव्यात उपयोगात आणत फसवणूक केली.
(प्रतिनिधी)
बनावट दस्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील कागदपत्रंची पडताळणी आणि तपासणी करण्यात येणार आहे. आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नसून, तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सूर्यकांत कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरूड.
4कुलकर्णी यांची पत्नी आर्चिस सुनीती विनय यांच्याविरुद्धही अकलुजकर यांनी मार्चमध्ये फेसबुकवर बदनामीकारक व जिवे ठार मारण्याची धमकीवजा मजकूर टाकल्याबद्दल कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्याचाही तपास कोथरूड पोलिसांकडेच असून, त्यामध्ये अद्याप प्रगती झालेली नाही.