‘भाईचंद रायसोनी’च्या आरोपींना पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:03 IST2020-11-29T04:03:59+5:302020-11-29T04:03:59+5:30

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतपेढीत गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्याचे अमिष दाखवून गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी जळगाव ...

Accused of 'Bhaichand Raisoni' remanded in police custody | ‘भाईचंद रायसोनी’च्या आरोपींना पोलिस कोठडी

‘भाईचंद रायसोनी’च्या आरोपींना पोलिस कोठडी

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतपेढीत गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्याचे अमिष दाखवून गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी जळगाव येथून चौघांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर चौघांनाही शनिवारी सहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुजित सुभाष बाविस्कर ऊर्फ वाणी (वय-४२), धरम किशोर साखला (४०), महावीर माणकचंद जैन (३७), विवेक देविदास ठाकरे (४५, सर्व रा.जळगाव) अशी त्या चौघांची नावे आहेत.

याबाबत रंजना खंडेराव घोरपडे (वय-६५, रा.भोसलेनगर) यांनी फिर्याद दिली होती. या गुन्हयात अवसायक जितेंद्र कंडारे, माहेश्‍वरी, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, योगेश साकला यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.

२०१५ मध्ये बीएचआर संस्थेवर प्रशासक म्हणून कंडारे यांची नेमणूक झाली. जून २०१६ मध्ये कंडारे यांचीच अवसायक म्हणूनही नेमणूक करण्यात आली. सन २०१५ पासून आतापर्यंत झालेला गैरव्यवहार उघड होऊ नये म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक लेखापरीक्षणच केलेले नाही. आरोपींनी संगनमत करुन पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाईट तयार करुन कटातील साथीदार सुनील झंवर आणि त्यांच्या फर्मच्या नावे बेकायदा वर्ग करुन पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्‍क्‍याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा आणि संस्थेच्या मालमत्तेचा अपहार केला. संस्थेच्या मालमत्ता अत्यंत अल्पदरात बेकायदा वर्ग केल्याचे दाखविले.

ठेवीदारांना पूर्ण रक्कम दिल्याच्या खोटया नोंदीदेखील करण्यात आल्या. याशिवाय, संस्थेच्या रेकॉर्डला संगनमताने सुजित वाणीने इतर आरोपींच्या सांगण्यावरुन संबंधित नोंदी केल्या आहेत. तक्रारदार रंजना घोरपडे व त्यांची बहिण यांनी गुंतवलेली एकूण १६ लाख ९० हजार रुपयांची आणि विवेक ठाकरे याने इतर आरोपींशी संगनमत करुन पैसे मिळवून देण्यासाठी १८ हजार ६०० रुपये घेवून फसवणुक करत पैशांचा अपहार केला.

बीएचआर या पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीसाठी दोन अधिकृत वेबसाईट अस्तीत्वात असतानाही, बनावट वेबसाईट तयार करण्यात आली होती. संस्थेची मालमत्ता विक्री केल्याचा खोटा देखावा करत त्यातून आलेल्या रकमेचाही अपहार केला. आतापर्यंत सोसायटीच्या संचालकांविरोधात एकूण ८१ गुन्हे दाखल असून सुमारे १२०० कोटी इतक्या रकमेचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जितेंद्र कंडारे याच्या घरझडतीत नऊ लाख ७९ हजार रुपये रोख तसेच २१ लाख ९९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तीन लाख 34 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या विटा मिळून आल्या. आरोपी सुनील झंवर याच्याकडे शासनाच्या वेगवेगळया वरीष्ठ अधिकाऱ्यांचे १०० पेक्षा अधिक अनेक बनावट शिक्के मिळून आलेले आहे. याबाबत तपास करण्यासाठी चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे ॲड. राजेश कावेडीया यांनी केली. तर मांडली. महावीर जैन याच्यातर्फे ॲड. प्रसाद कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

Web Title: Accused of 'Bhaichand Raisoni' remanded in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.