आळेफाटा पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:35+5:302021-03-09T04:11:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळेफाटा : गुन्हा दाखल असलेल्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहातील कीटकनाशक औषध पाशन करून ...

आळेफाटा पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
आळेफाटा : गुन्हा दाखल असलेल्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहातील कीटकनाशक औषध पाशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आळेफाटा (ता. जुन्नर) पोलीस ठाण्यात शनिवारी (दि ६) घडली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवंडी (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथील एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या आरोपीने शौचास लागली म्हणून बहाणा करीत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या स्वच्छतागृहातील कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळ होऊनही आरोपी आला नाही, म्हणून पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तो स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही. पोलीस उपनिरीक्षक सतीश डवले यांच्याकडे चौकशी केली असता एका गुन्ह्यातील आरोपींला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, आपल्यावर गुन्हा दाखल झाला या भीतीपोटी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलीस निगराणीत उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णालयातून सुटल्यावर त्याला पुन्हा ताब्यात घेतले जाईल, हा तपास तेच करत असल्याचे त्यांनी सांगितले.