युवकावर झालेल्या गोळीबारप्रकरणी आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:43+5:302021-02-05T05:09:43+5:30
याबाबत माहिती देताना स्थानिक गु्न्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले की,(दि.२६ जानेवारी) रोजी शिरूर शहरात सी. ...

युवकावर झालेल्या गोळीबारप्रकरणी आरोपींना अटक
याबाबत माहिती देताना स्थानिक गु्न्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले की,(दि.२६ जानेवारी) रोजी शिरूर शहरात सी. टी. बोरा कॉलेज रोडवर मोटारसायकलवर येउन अज्ञात व्यक्तींनी प्रवीण गव्हाणे याच्यावर हल्ला चढवत गोळीबार केला होता. हल्लेखोर पळून गेले होते. यात युवक थोडक्यात बचावला होता. घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलिसांनी भेट घेत तपास सुरु केला होता.
नीलेश उर्फ नानू चंद्रकांत कुर्लप, मुकेश उर्फ बाबू चंद्रकांत कुर्लप, गणेश चंद्रकांत कुर्लप (सर्व रा.कामाठीपुरा, शिरूर), महेंद्र येवले (रा. सोनारआळी, शिरूर),गोपाळ संजय यादव,राहुल पवार(रांजणगाव) यांनी प्रवीण गव्हाणे हा गोपाळ यादव याचा खून करणार आहे असा चुकीचा समज करून घेऊन व एन.के.साम्राज्य या ग्रुपचे वर्चस्व वाढविण्याकरिता गव्हाणे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कट केला होता.तशी सुपारी दिली होती.त्यानुसार गव्हाणे याच्यावर कॉलेजरोडवर गव्हाणे याच्यावर हल्ला करण्यात आला.त्यात गव्हाणे हा थोडक्यात बचावला.
दरम्यान,गुन्हयातील आरोपी गोपाळ यादव व अभिजित उर्फ जपानी कृष्णा भोसले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सासवड येथून ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक तपास केला असता यादव याने प्रवीण गव्हाणे याला मारण्यासाठी शुभम सतीश पवार(रा.पापडेवस्ती,भेकराईनगर,पुणे),अभिजित उर्फ जपानी कृष्णा भोसले(रा.भेकराईनगर),शुभम विजय पांचाळ(रा.हडपसर),निशांत भगवान भगत(रा.भेकराईनगर,पुणे),आदित्य औदुंबर डंबरे(रा.ससाणेनगर,हडपसर),शुभम उर्फ बंटी किसन यादव(गोंधळेनगर,हडपसर) यांना सुपारी दिली असल्याची माहिती दिली. त्यानुसार आरोपी अभिजित भोसले,शुभम पवार,शुभम पांचाळ,निशांत भगत,आदित्य डंबरे यांनी प्रत्यक्षघटनास्थळी जाऊन व शुभम यादव याने गुन्ह्याकरिता पिस्तूल पुरवून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे घनवट यांनी सांगितले. गु्ह्यातील आरोपींनी तसेच एन.के.साम्राज्य ग्रुपच्या सदस्यांनी अत्याचार केलेबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.