चोरीप्रकरणी अटक आरोपीला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:12 IST2021-01-21T04:12:02+5:302021-01-21T04:12:02+5:30
पुणे : घराचा दरवाजा उचकटून बेडरुममधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाख १७ हजार रुपयांचा ऐवज ...

चोरीप्रकरणी अटक आरोपीला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
पुणे : घराचा दरवाजा उचकटून बेडरुममधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शशिकांत अनंत माने (वय २४, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुनीता यशवंत पवार (वय ५५, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांच्या घरात ११ डिसेंबर २०२० रोजी चोरी झाली होती. माने याला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा मोबाईल आणि एक लाख २० हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी माने याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली होती.