कारेगाव दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:45+5:302021-02-05T05:03:45+5:30
सूरज मनचक्या भोसले व दीपक मनचक्या भोसले (रा. करपडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

कारेगाव दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक
सूरज मनचक्या भोसले व दीपक मनचक्या भोसले (रा. करपडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारेगाव-कर्डे रोडवरील गावडेवस्ती येथे २९ जानेवारी रात्री दोनच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यांनी दरोडा टाकुन लाकडी दांडके व लोखंडी रॉडने झोपलेल्या पाच जणांना मारहाण केली होती. तसेच, दोन तोळ्यांचे दागिने व रोख रक्कम असा ७५ हजारांचा
ऐवज चोरून नेला होता.
चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये दिलीप सोपान पाटील, विधाबाई दिलीप पाटील, महानंदा केरबा भोसले, केरबा तुकाराम भोसले, वर्षा विलास शिंदे गंभीर झाले होते. याबाबत केरबा तुकाराम भोसले यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेनंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, भोर उपविभाग अधिक्षक अमृत देशमुख, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, फिंगर प्रिट पथक,
ग्रामीण श्वान पथकाने तात्काळ भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले हाेते.
रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सहायक पोलीस निरीक्षक एस. जे. येळे यांनी वेगवेगळी तपास पथक तयार करून त्यांचे रेखाचित्र तयार केले होते. रेकॉर्डवरील आरोपी यांचा रेखाचित्राशी मिळते-जुळते असलेले संशयित आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक एस. जे. येळे, पोलीस सब इंस्पेक्टर शुभांगी कुटे, पोलीस हवालदार तुषार पंदारे, पोलीस नाईक गणेश सुतार, सहाय्यक फौजदार मुस्ताक शेख, विजय शिंदे, उमेश कुतवळ, विलास आंबेकर, ज्ञानेश्वर शिंदे, साबळे, विनोद काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय गिरमकर, गणेश नाईक, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, उमाकांत कुंजीर या पथकाने तपास करुन कारवाई केली.