दोन वर्षांपासून फरार आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST2021-06-19T04:08:24+5:302021-06-19T04:08:24+5:30

दि. २६ मार्च २०१९ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत सुपा घाटात पहिल्या वळणावर रात्री एक ...

Accused absconding for two years arrested | दोन वर्षांपासून फरार आरोपीला अटक

दोन वर्षांपासून फरार आरोपीला अटक

दि. २६ मार्च २०१९ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत सुपा घाटात पहिल्या वळणावर रात्री एक मालवाहतूक करणारा ट्रक ३१ टन वजनाचे गहू घेऊन जात होता. ट्रकला एका कारने आडवी मारून ट्रक थांबवून ड्रायव्हरला मारहाण करीत आरोपींनी दरोडा टाकला होता. संबंधित गुन्ह्यात एकूण १० आरोपींची नावे समोर आली होती. त्यातील ९ आरोपींना काही दिवसांतच अटक करण्यात आली होती. परंतु एक आरोपी गेली २ वर्षांपासून फरार होता.

पुणे सोलापूर महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना त्यांना फरार आरोपी अमोल कसबे हा उरुळी देवाची

गावात प्रवेश करणाऱ्या रोडच्या डावीकडे असणाऱ्या हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने उरुळी देवाची येथे जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

Web Title: Accused absconding for two years arrested