शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्येतील आरोपींवर १५ सप्टेंबरला होणार दोषारोप निश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:14 IST

शेवटची मुदतवाढ : वकील, नातेवाईकांना भेटण्याची आरोपींची मागणी

ठळक मुद्देडॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर मंगळवारी (दि.७) दोषारोप निश्चिती करण्यात येणार होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चिती १५ सप्टेंबरला होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर मंगळवारी (दि.७) दोषारोप निश्चिती करण्यात येणार होती. त्यासाठी अंदुरे, डॉ. तावडे, ॲड. पुनाळेकर हे व्हिडीओ कॉन्स्फरन्सद्वारे उपस्थित होते. भावे स्वत: हजर होता. तर कळसकर तांत्रिक अडचणींमुळे हजर राहू शकला नाही. न्यायालयाने आरोपींना गुन्हा मान्य आहे का, अशी विचारणा केली. मात्र, कोरोनामुळे नातेवाईक व वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आरोप निश्चितीला मुदत मिळावी, अशी विनंती सचिन अंदुरे व डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी केली. पाच आरोपींपैकी एक आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्याने दोन आरोपींनी केलेली मुदतवाढीची विनंती न्यायालयाने मान्य केली. मात्र, यानंतर आणखी मुदतवाढ देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खटला लवकर चालवावा लागेल, असे सांगत विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनीच आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांना कोणती तारीख देऊ, अशी विचारणा केली. सीबीआयच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी कामकाज पाहत आहेत.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCourtन्यायालयPuneपुणे