शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अातापर्यंत माळेचे मणी सापडलेत, लवकरच दाेराही सापडेल : डाॅ. शैला दाभाेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 17:58 IST

डॉ. दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त समितीचे कार्यकर्ते अरुण जाधव यांनी संकलित केलेल्या विविध वृत्तपत्रांतील बातम्यांच्या कात्रण प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात अाले अाहे.

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारांना कधी पकडणार? हा प्रश्न आपण पाच वर्षे झाली तरी विचारतच आहोत. तपासी यंत्रणा काम करीत असून तपासाला आता यश येत आहे. खून प्रकरणाच्या तपासामध्ये आतापर्यंत माळेचे मणी सापडले आहेत. पण, तपासी यंत्रणेला लवकरच दोराही सापडेल, असा विश्वास डॉ. शैला दाभोलकर यांनी रविवारी व्यक्त केला.

    डॉ. दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त समितीचे कार्यकर्ते अरुण जाधव यांनी संकलित केलेल्या विविध वृत्तपत्रांतील बातम्यांच्या कात्रण प्रदर्शनाचे उदघाटन दाभोलकर यांच्या हस्ते झाले. डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, ठकसेन गोराणे, श्रीपाद ललवाणी, नंदिनी जाधव, विजया जाधव या वेळी उपस्थित होत्या. बालगंधर्व कलादालन येथे सोमवारी (२० आॅगस्ट) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. आपण काम खूप करतो. पण, त्याचे जतनीकरण करत नाही, असे डॉ. दाभोलकर नेहमी म्हणायचे. हे प्रदर्शन म्हणजे समितीने गेल्या पाच वर्षांत विवेकशील मार्गाने  दिलेल्या लढ्याचे जतनीकरण आहे, असे सांगून शैला दाभोलकर म्हणाल्या, या प्रदर्शनावर आधारित लघुपटाची निर्मिती करण्याची तसेच बातम्यांच्या पुस्तिका प्रकाशित करून समितीच्या विविध शाखांमध्ये प्रसारित करण्याची आवश्यकता आहे. दाभोलकर यांना पाहिलेले नाही, अशा नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना निर्भयता म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल.

    जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते ही समितीची ताकद आहे. संघटनेला पुढे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच संघटना वर्धिष्णू होत राहील, अशी अपेक्षा मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरnewsबातम्या