शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मागासलेपणाचे नव्या निकषांनुसार सर्वेक्षण , अहवाल राज्य सरकारला सादर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 04:12 IST

आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नव्या निकषांनुसार शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या

पुणे : आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नव्या निकषांनुसार शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक निवृत्त न्यायाधीश एस. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सदस्य सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, डॉ. राजाभाऊ करपे, डॉ. भूषण कर्डिले, डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. प्रमोद येवले, सुधीर ठाकरे आणि रोहिदास जाधव उपस्थित होते.मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि विविध अहवाल राज्य सरकारने आयोगाला सादर केले. त्याची सविस्तर चर्चा झाली. या बाबी पडताळून पाहण्यासाठी मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय आयोगाने घेतला. सर्वेक्षण करण्याचा अधिकार आयोगाला असून, सर्वेक्षणाची पद्धती, निकालाचे निकष आदींबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. त्यानुसार, मराठा समाजाचे राज्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील सद्य:स्थिती या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात येणार आहे. या अहवालातून मराठा समाजाची सर्व क्षेत्रांनुसार सद्य:स्थिती मांडली जाणार आहे़पुढील बैठक १६ डिसेंबरलाआयोगाचे माजी अध्यक्ष संभाजी म्हसे यांचे निधन झाल्यामुळे काही महिन्यांपासून आयोगाच्या सदस्यांची बैठक झाली नव्हती. पुढची बैठक १६ डिसेंबर रोजी होईल.जिल्हानिहाय दोन गावे, नगरपालिकांचे सर्वेक्षणसर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील जिल्हानिहाय पंचायत समित्यांमधील दोन गावे निवडली जातील. तर, नगरपालिकांची निवड आयोगाच्या सदस्यांकडून केली जाईल. त्या गावातील मराठा समाजाला देण्यात आलेल्या राजकीय, शैक्षणिक संधीचा अहवाल तयार केला जाईल. यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडल, तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. प्रशासकीय अधिकाºयांच्या माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)कडून मराठा समाजाच्या अधिकाºयांच्या संख्येची माहिती संकलित केली जाईल. राज्यातील सर्व विद्यापीठांमधून मराठा समाजाच्या मुला-मुलींच्या पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. शिक्षण घेतलेल्यांची आकडेवारी घेतली जाईल, अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :marathaमराठाMaharashtraमहाराष्ट्र