शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीने दिलेल्या धडकेच पती-पत्नी ठार; सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 18:22 IST

हॉटेलात जेवण करून पायी घरी परतत असलेल्या पती-पत्नीस दुचाकीने धडक दिल्याने ते दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १७) रात्री ९-१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअपघातामध्ये हनुमंत लोखंडे (वय ४५) व सुनीता लोखंडे (वय ४२) हे पती-पत्नी मृत्युमुखीदुचाकीचालक आकाश सरनाप्पा नागोरे याच्यावर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : हॉटेलात जेवण करून पायी घरी परतत असलेल्या पती-पत्नीस दुचाकीने धडक दिल्याने ते दोघेही मृत्युमुखी पडले आहेत.  दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले असल्याची घटना सोलापूर-पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १७) रात्री ९-१५ वाजण्याच्या सुमारास घडली.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार : या अपघातामध्ये हनुमंत विठ्ठल लोखंडे (वय ४५) व सुनीता हनुमंत लोखंडे (वय ४२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे पती-पत्नी) मृत्युमुखी पडले आहेत. दुचाकीवरील चालक आकाश सरनाप्पा नागोरे व त्याचे मित्र गुरुप्रसाद बाळासाहेब जानराव, लक्ष्मण गुरुप्रसाद चव्हाण (तिघेही रा. उरुळी कांचन) गंभीर जखमी झाले आहेत.मृत सुनीता लोखंडे यांचे बंधू धनंजय रामदास पोपळघट (रा. तळवाडी चौक, उरुळी कांचन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (दि. १७) लोखंडे पतीपत्नी हॉटेल सोनाई येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्गावर इरिगेशन कॉलनीनजीक आले असता त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रमांक नसलेल्या दुचाकीने धडक दिली. यामुळे ते दोघे महामार्गावर व दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पाईपवर पडले.स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच लोखंडे पती-पत्नी मृत झाले होते. दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औषधोपचार चालू आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकीचालक आकाश सरनाप्पा नागोरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे