शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे द्रुतगतीवर कामशेत बोगद्यात 7 वाहनांचा विचित्र अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 11:52 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्यात सोमवारी (4 डिसेंबर) रात्री सात वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्यात सोमवारी (4 डिसेंबर) रात्री सात वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्यात अज्ञात वाहनांमधून इंधन गळती झाली होती. तसेच रात्री मावळ परिसरात झालेल्या पावसाने रस्ते निसरडे झाले होते. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेले एक वाहन या इंधनावरुन घसरल्याने मागील वाहनांनी ब्रेक मारला, अचानक समोरची गाडी थांबल्याने एकामागे एक अशी सात वाहने एकमेकांवर आदळत विचित्र अपघात झाला. 

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातात कोणी जखमी झाले नाही मात्र सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रात आलेल्या ओखी वादळामुळे सोमवारी सायंकाळपासून लोणावळा व मावळ परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाच्या सरी कमी अधिक प्रमाणात कोसळत असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. तसेच वेगवान वा-यामुळेदेखील मुंबई पुणे द्रुतगती तसेच राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांनी व वाहन चालकांनी वाहने चालविताना वेगावर नियंत्रण ठेवत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेMumbaiमुंबई