शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या दोघांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:43 IST

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सोमाटणे फाट्याकडे जात असताना दुचाकीला भरधाव एसटी बसची पाठीमागून जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे मित्र ठार झाले.

पुणे, दि. 27 - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सोमाटणे फाट्याकडे जात असताना दुचाकीला भरधाव एसटी बसची पाठीमागून जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे मित्र ठार झाले.

हा अपघात जुन्या पुणे -मुंबई महामार्गावरील तळेगाव खिंडीतील विजय मारूती मंदिरानजीक रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.सिद्धाराम मलाप्पा बंदिछोडे (वय २१ ,रा.खंडोबा माळ, संभाजीनगर,तळेगाव दाभाडे,मूळ रा. हत्तीकणबस,ता.अक्कलकोट,जि.सोलापूर ) व संकेत संतोष गुंडाळ (वय १७ रा. संभाजीनगर ,तळेगाव दाभाडे ता. मावळ,जि.पुणे) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. ते दोघेही अविवाहित होते.

एस.टी.बस चालक विष्णू मारुती घुले (वय 43,रा.डोळेवाडी,ता.जामखेड,जि.अहमदनगर)याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या संदर्भात मयत सिद्धाराम बंदिछोडे याचा मोठा भाऊ बिराप्पा मल्लाप्पा बंदिछोडे (वय 27रा.)यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून (एम. एच.१४ बी पी - २३१४) सिद्धाराम बंदिछोडे व त्याचा मित्र संकेत गुंडाळ हे सोमाटणे फाटा येथे जात असताना,मुंबईहून पुणे बाजूला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामखेड आगाराच्या बसची (क्र.एम. एच.20 बी.एल.- 4165)तळेगाव खिंडीत दुचाकीला पाठीमागून जोरात धडक बसली.या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना सोमाटणे फाटा येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.अपघाताचे वृत्त समजताच संभाजीनगर परिसरात शोककळा पसरली.सिद्धाराम हा दुचाकी चालवित होता.या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला . घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.संकेत गुंडाळ हा तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्या मंदीर ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात शिकत होता. सिद्धाराम बंदिछोडे हा कुशल प्लंबर होता. तो तीन वर्षापूर्वी गावावरून कामानिमित्त तळेगाव येथे भावाकडे आला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवAccidentअपघात