शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

एफटीआयआयच्या दोन विद्यार्थ्यांना शूट करताना अपघात : २२ फूटांवरुन खाली पडून जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:36 IST

दिवेआगरच्या शेरवाडी गावामध्ये सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षातील दोन विद्यार्थी डिप्लोमा फिल्म शूट करत असताना २२ फुटावरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाले.

ठळक मुद्देएकाचा पाय तुटला असून, एकाच्या डोक्याला गंभीर मार संस्थेच्या प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याने ही गंभीर घटना घडली असल्याचा आरोप २०१३-१६ आणि १७ बँचच्या विद्यार्थ्यांनी कुलसचिवांसह विभागप्रमुख विभागाकडेही तक्रार

पुणे : एफटीआयआयच्या २०१३ च्या सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षातील दोन विद्यार्थी डिप्लोमा फिल्म शूट करत असताना २२ फुटावरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाले. दिवेआगरच्या शेरवाडी गावामध्ये ही घटना घडली. यामध्ये एकाचा पाय तुटला असून, एकाच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्यांच्यासह दोन लाईट बॉ़य देखील जखमी झाले आहेत. या चौघांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संस्थेच्या प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याने ही गंभीर घटना घडली असून, याला कुलसचिवांसह  सिनेमँटोग्राफीचे विभागप्रमुख प्रसन्नकुमार जैन जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान,विद्यार्थ्यांना योग्य ते उपचार मिळणे हा आमचा पहिला प्राधान्यक्रम असेल, त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेतल्यानंतरच ही घटना कशी घडली हे कळेल. पण जर निकृष्ट दर्जाचे साहित्य असेल तर त्याची नक्कीच चौकशी केली जाईल असे संचालक भूपेंद्र कँंथोला यांनी सांगितले. या घटनेमध्ये सतीशकुमार, अनुज उजावणे हे दोन विद्यार्थी आणि ला़ईट बॉ़य गंभीर जखमी झाले आहेत. एफटीआयआयच्या २०१३ बँचचे विद्यार्थी शेवटच्या वर्षात महत्वपूर्ण असलेली डिप्लोमा फिल्म शूट करण्यासाठी दिवेआगरला गेले आहेत. त्यांना प्रशासनाकडून भाडेतत्वावर शुटिंगसाठी आवश्यक असे काही साहित्य देण्यात आले आहे. मात्र हे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात २०१३-१६ आणि १७ बँचच्या विद्यार्थ्यांनी कुलसचिवांसह विभागप्रमुख,प्रॉडकशन विभागाकडेही तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विक्रेत्याकडून कमी पैशात साहित्य घेण्याच्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरावी लागत आहे. ही घटना घडविल्याचे प्रशासन कार्यालयाला कळविल्यानंतर साहित्य निकृष्ट दर्जाचे माहीत असूनही का वापरले? असा प्रतिप्रश्न करण्यात आला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोलाStudentविद्यार्थी