शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली अपघात; टँकर घुसला मिठाईच्या दुकानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 19:32 IST

वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली एका सिमेंट टँकरचा भीषण अपघात झाला  आहे. अपघात इतका भीषण होता, की हा टँकर येथील मिठाईच्या दुकानात घुसला. 

ठळक मुद्देसिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने तो थेट घुसला मिठाईच्या दुकानातअपघातात एका तरुणीचा मृत्यू तर दोन जण जखमी

पुणे : वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणाऱ्या सिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. हा टँकर सरळ विश्व आर्केड इमारतीमधल्या सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसल्याने टँकरच्या चाकाखाली येऊन तरूणीचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ट्ँकरचालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. अपघाताची बातमी कळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. स्वाती मधुकर ओरके (वय २९, रा. कर्वेनगर, मूळ पुलगाव, वर्धा) असे ठार  झालेल्या युवतीचे नाव आहे. ती संगणक अभियंता होती तर संदीप पाटील ( वय ३०,  वाल्हेकर कॉलनी, नऱ्हे) आणि सुनील बाळासाहेब साळुंखे ( वय ४१, भूमकरनगर, रा. नऱ्हे) अशी जखमींची नावे आहेत. प्रमोद मारूती कणसे ( वय ३०, मु. पो. भिगवण स्टेशन, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. लुंकड ट्रान्सपोर्टचा एक मिक्स सिमेंट घेऊन जाणारा टँकर कात्रजकडून येत होता. नवले पुलाखाली आल्यानंतर भरधाव वेगातील टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट समोरील विश्व आर्केड कॉम्पलेक्सच्या इमारतीमध्ये घुसला. दोन वाहनांना ठोकर मारत आवारातील पाणीपुरी स्टॉलला उडवून तळमजल्यावरील सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसला. त्यावेळी तेथे स्वाती ओरके ही नाश्ता करण्यासाठी आली होती. दुकानाच्या जिन्यात महिला आणि दोन व्यक्ती अडकल्या. युवती भिंती आणि चाकाच्या मध्ये आली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्यात आला. युवती आणि तिघांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र युवती चाकाखाली आल्याने मरण पावली. दोघांना नवले रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी प्रभाकर उम्राटकर, स्टेशन आॅफिसर प्रकाश गोरे, सतीश डाकवे, राजेश वाझे, संदीप पवार, मनोज ओव्हाळ यांनी ही कामगिरी केली. वाहनचालकावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. जगताप करीत आहेत. 

 

टॅग्स :Puneपुणे