याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जून रोजी राजू हा पॅशन मोटारसायकल (एमएच १४ जीआर ७२१८) वरून निगडी येथे त्याच्या घरी निघाला होता. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याच्या वडिलांनी राजूला फोन करून विचारपूस केली असता, त्याने मोटारसायकल चालवत आहे. रात्री ९ वाजेपर्यंत घरी येतो असे सांगितले. त्यानंतर रात्री नऊ वाजून गेले तरी राजू घरी न आल्याने वडिलांनी त्याला फोन केला असता, त्यावेळी ॲम्ब्युलन्सचालक आदित्य पवार याने फोन उचलून राजू बागल यांचा पेठ गावच्या हद्दीत पुणे-नाशिक रोडवर अपघात झाला असून, त्यांना रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. पेठ गावच्या हद्दीत पुणे-नाशिक हायवेवर त्याला एका अज्ञात वाहनाने धडक देऊन पळ काढला. त्यामध्ये तो गंभीर झाल्याचे निष्पन्न झाले. याबबात मंचर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात; मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST