शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 20:12 IST

अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. 

लोणावळा : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळील देवले व औंढे पुलादरम्यान अशोका ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसची पुढे जात असलेल्या आयशर टेम्पोला जोरात धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ११ प्रवासी गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. हा अपघात गुरुवारी पहाटे पाचच्या वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. 

आशिया अयाज तांबोळी (वय-४५, रा.सांगली), फुलाबाई श्रीकांत काळे (वय-६५, रा. मुंबई), बसचालक,दिनकर डोंगरे (वय-५०),  सहायक चालक विशाल माने (वय-२५), संजय श्रीकांत काळे (वय-४०), संजय शिवाजी भोसले (वय-५०), मंगल सुरेश सुतार (वय-६०), अमोल रामचंद्र पाटील (वय-३१), प्रिया सुशांत सुतार (वय-३४), वैभव रघुनाथ जाधव (वय-२५), शुभम हेमंत चिमगावकर (वय-२०), दिपक प्रकाश गायकवाड (वय-४८), किरण बाळासाहेब काळे (वय-४९), सईबाई जयराम शेळके (वय-३६), कुमार राजमोहम्मद शेख (वय-२५), पृथ्वी संजय देवकाते (वय-२५), प्रणित गणेश मोरे (वय-२५, सर्व रा. कोल्हापूर), संतोष जगन्नाथ राऊत (वय-४९, धनकवडी, पुणे),जिग्नेश रमेश शहा (वय-४९, रा.गुजरात), नविना अतुल पाटोळे (वय-२३), अतुल बबन पाटोळे (वय -३०, दोघेही रा. नेरूळ), सुनिता सुभाष पोळ (वय -५५, रा. भांडूप, मुंबई), स्वप्निल हरिंद्रसिंह सोदी (वय-३४, रा.ठाणे) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून बोरिवलीला प्रवासी घेऊन जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या बस (क्रमांक -एमएच-५१/सी-०९०९) च्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढे जात असलेल्या एका अज्ञात आयशर टेम्पोला मागून जोरात धडकून हा अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाल्याने बसमधील २३ प्रवासी जखमी झाले असून, यापैकी ११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक विजय शेटे, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत आवारे, पोलिस हवालदार विजय गाले, सिताराम बोकड व दोन्ही पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह देवदूत आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पहाणी करत पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथकाच्या मदतीने बसमधील सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी सोमाटणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर किरकोळ जखमींना घटनास्थळी उपचार करण्यात आली. त्यानंतर अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात