अचानक ब्रेक दाबल्याने अपघात
By Admin | Updated: December 23, 2016 00:03 IST2016-12-23T00:03:14+5:302016-12-23T00:03:14+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावर वरकुटेपाटी येथे गतिरोधकामुळे अचाकन ब्रेक दाबल्यामुळे बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजता प्रवासी

अचानक ब्रेक दाबल्याने अपघात
लोणी देवकर : पुणे-सोलापूर महामार्गावर वरकुटेपाटी येथे गतिरोधकामुळे अचाकन ब्रेक दाबल्यामुळे बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजता प्रवासी ट्रॅव्हल्सने (एमएच ०४-जीपी १६२५) पाठीमागून टँकरला ठोकरले, तर ट्रॅव्हल्सला ट्रकने (एमएच ०४-एएल ४४९५) पाठीमागून ठोकरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ट्रक व ट्रॅव्हल्सचे या वेळी मोठे नुकसान झाले. वरकुटेपाटी येथील वेग नियंत्रक हा मोठा व डबल असल्याने वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक आहे. या गतिरोधकामुळे या ठिकाणी या प्रकारे अपघात रोजच घडत असल्याने रस्ते बांधकाम विभागाने तत्काळ वरकुटेपाटीजवळील वेगनियंत्रक काढून टाकावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.(वार्ताहर)