अरुंद रस्त्यामुळे अपघात

By Admin | Updated: May 13, 2016 01:08 IST2016-05-13T01:08:57+5:302016-05-13T01:08:57+5:30

दौंड तालुक्यातील राज्यमार्ग असलेला चौफुला-सुपा रस्ता हा सध्याच्या स्थितीमध्ये अपघातांना निमंत्रण देणारा दिसत आहे. या रस्त्यावरती अनेक लहान-मोठे अपघात नित्याने होत चालले आहे.

Accident due to narrow road | अरुंद रस्त्यामुळे अपघात

अरुंद रस्त्यामुळे अपघात

खोर : दौंड तालुक्यातील राज्यमार्ग असलेला चौफुला-सुपा रस्ता हा सध्याच्या स्थितीमध्ये अपघातांना निमंत्रण देणारा दिसत आहे. या रस्त्यावरती अनेक लहान-मोठे अपघात नित्याने होत चालले आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची रहदारी असलेला हा राज्यमार्ग आहे. या चौफुला-सुपा रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी आता परिसरामधून जोर धरू लागली आहे. अरुंद रस्ता असल्याने व त्यातच वाहनांची एकमेकांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याची रस्सीखेच पाहता हा रस्ता तितकासा योग्य नाही. रस्त्याचे रुंदीकरण
केल्यास निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
या आठवड्यातच दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होऊन दोन तरुणांना आपले जीव घमवावे लागले. अशा प्रकारचे कित्येक अपघात आजवर होत गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या चौफुला-सुपा रस्त्याच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष घालण्याची सध्या खऱ्या अर्थाने वेळ आली आहे.
लवकरात लवकर या चौफुला-सुपा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी ग्रामस्थ, प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Accident due to narrow road