भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर पोंधवडी गावच्या हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. वेगवान वाहने आणि धोकादायक क्रॉसिंगमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून महामार्ग पोलिसांनी या विषयीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, लातूर येथील डॉक्टर कुटुंबीय सोलापूर मार्गे पुण्याला जात असताना पोंधवडी गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने कार नं. एम. एच. २४ ए एस १९२८ पलटी खात रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला घसरली. यात कारमधील डॉ. विक्रम कुंडुबले (वय ३५), डॉ. प्रियांका कुंडुबले (वय ३०), शोभा सिद्धेश्वर पाटील (वय ५६) वरूण पाटील (वय ३२), सिद्धेश्वर पाटील (वय ६३) हे गंभीर जखमी झाले. कारच्या पलटी होताना सुदैवाने गाडीतील जीवरक्षक फुगे खोलले गेल्याने जीवितहानी टळली. अपघातातील जखमींना भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील पोंधवडीत चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; पाच गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 17:04 IST
पुणे-सोलापूर महामार्गावर पोंधवडी गावच्या हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
पुणे-सोलापूर महामार्गावरील पोंधवडीत चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; पाच गंभीर जखमी
ठळक मुद्देसुदैवाने गाडीतील जीवरक्षक फुगे खोलले गेल्याने टळली जीवितहानी वेगवान वाहने आणि धोकादायक क्रॉसिंगमुळे अपघाताचे वाढले प्रमाण