बोनी कपूरच्या गाडीला अपघात

By Admin | Updated: May 15, 2014 04:46 IST2014-05-14T22:28:10+5:302014-05-15T04:46:48+5:30

चित्रपटाचे चित्रीकरण संपवून लोणंदहून फलटणकडे निघालेल्या दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या कारला टॅ्रक्टरने धडक दिली.

Accident of Bonnie Kapoor's car | बोनी कपूरच्या गाडीला अपघात

बोनी कपूरच्या गाडीला अपघात

साखरवाडी (जि़ सातारा) : चित्रपटाचे चित्रीकरण संपवून लोणंदहून फलटणकडे निघालेल्या दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या कारला टॅ्रक्टरने धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून, विजय गाडे (३३) असे त्याचे नाव आहे़ हा अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. अपघातात सुदैवाने कोणताही कलाकार जखमी झाला नाही़ मात्र, कपूर यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे़
काही दिवसांपासून लोणंद परिसरात एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. बुधवारी सायंकाळी चित्रीकरण संपवून दिग्दर्शक बोनी कपूर, अभिनेता संजीव कपूरसह अन्य कलाकार कारमधून फलटणकडे निघाले होते. तरडगावपासून तीन किलोमिटर अंतरावर आले असता चुकीच्या दिशेने ट्रॅक्टर समोर आला. त्यामुळे कपूर यांच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून दोन्ही वाहने समोरासमोर धडकली. यामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. लोणंद पोलिसांनी जखमी टॅ्रक्टरचालकाला तर बोनी कपूर आणि इतर कलाकार दुसर्‍या कारने फलटला गेले. (वार्ताहर)

Web Title: Accident of Bonnie Kapoor's car