कोटीची निविदा बिनबोभाट मंजूर

By Admin | Updated: August 18, 2014 05:20 IST2014-08-18T05:20:25+5:302014-08-18T05:20:25+5:30

महापालिकेला मोटार सारथी पुरविण्यासाठी १ कोटीची निविदा ऐनवेळी दाखल करून विनाबोभाट मान्यता स्थायी समितीने दिली.

Acceptance of tender bill | कोटीची निविदा बिनबोभाट मंजूर

कोटीची निविदा बिनबोभाट मंजूर

पुणे : महापालिकेला मोटार सारथी पुरविण्यासाठी १ कोटीची निविदा ऐनवेळी दाखल करून विनाबोभाट मान्यता स्थायी समितीने दिली. मात्र, ज्या ठेकेदारांना निविदेचे काम दिले आहे, त्यापैकी एका ठेकेदाराने चालक पुरविल्याच्या अनुभवाचे खोटे दाखल व प्रमाणपत्र सादर केले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करीत महापालिकेच्या अधिका-यांनी दबावापोटी निविदा स्थायी समितीपुढे सादर केली.
विधानसभा आचारसंहितेची भिती दाखवित वादग्रस्त विषय ऐनवेळी दाखल मान्य करण्याचे प्रकार स्थायी समितीमध्ये सुरू आहेत. गेल्या आठवड्यातील स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर २१ विषय असताना ऐनवेळी ४३ विषय दाखल करून तातडीने मान्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: Acceptance of tender bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.