शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चार्जिंग नसल्याने ‘पीएमपी’च्या ई-बसचा एसी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 14:01 IST

प्रवाशांना फुटतोय घाम 

ठळक मुद्दे‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या सुमारे १२५ ई-बस आहेत.

पुणे : धावत्या इलेक्ट्रिक बसमधील वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद ठेवल्याने प्रवाशांची घुसमट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. चार्जिंग पुरेसे नसल्याने एसी बंद ठेवला जात असल्याचे कारण चालकांकडून दिले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पूर्ण चार्जिंग नसताना बस मार्गावर आणण्यात येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या सुमारे १२५ ई-बस आहेत. या बसची चार्जिंग स्टेशन भेकराईनगर व निगडी आगारामध्ये आहेत. तीन ते चार तासांच्या चार्जिंगनंतर त्या किमान २२५ किलोमीटर धावतात. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी बस चार्जिंग केल्या जातात. पण चार्जिंग स्टेशन कमी असल्याने दिवसाही काही बसची बॅटरी चार्जिंग करावी लागते. परिणामी एका वेळी सर्व बस मार्गावर येऊ शकत नाही. त्यातच आता चार्जिंगअभावी बसमधील एसी बंद असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. पीएमपी प्रवासी मंचचे सचिव संजय शितोळे यांना दोन दिवस अनुभव आला. सोमवारी थरमॅक्स चौक ते लांडेवाडी या मार्गावर ई-बसमधून प्रवास करताना एसी बंद होता. संबंधित वाहकास प्रश्न विचारले असता चार्जिंग कमी आहे, ३० टक्केच आहे असे सांगितले. मंगळवारी सकाळी शिवाजी चौक ते कासारवाडी असा प्रवास करत असताना पुन्हा तोच अनुभव आला. संबंधित वाहकानेही चार्जिंग कमी असल्याचा दावा केला. त्यानंतर ही बस थांबवून दुसरी बस बोलवा, असा आग्रह केल्यावर एसी चालू केला. पण कुलिंग सिस्टिम बंदच करून फक्त फॅन चालू ठेवले. एसी बंदप्रमाणेच बसचे डिजिटल फलक, उद्घोषणा यंत्रणाही बंद असतात. याबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचे शितोळे म्हणाले.........प्रवाशांना श्वास घेण्यास अडचणी एसी बंद ठेवल्यानंतर बसमध्ये हवा खेळती राहत नाही. दमटपणा वाढून बसमधील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. पण याकडे दुर्लक्ष करून चालकांकडून संपूर्ण एसी बंद ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे ज्येष्ठ, आजारी, श्वसनाचा त्रास असलेल्या प्रवाशांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे अर्धवट चार्जिंग असताना बस मार्गावर सोडण्याचा धोका पीएमपीने पत्करू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे