अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील फोटो व्हायरलची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:10 IST2021-04-09T04:10:23+5:302021-04-09T04:10:23+5:30

पुणे : १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला ...

Abuse of a minor girl; Porn photo viral threat | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील फोटो व्हायरलची धमकी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील फोटो व्हायरलची धमकी

पुणे : १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रोहिदास ऊर्फ मोन्या नवनाथ वाडघरे (रा. कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव खुर्द येथे ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. रोहिदास वाडघरे याने १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो काढले. ही घटना कोणाला सांगितली तर तुझे फोटो सर्वांना दाखवीन, अशी धमकी दिली. हा प्रकार या मुलीने आईला सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक वठेकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Abuse of a minor girl; Porn photo viral threat