कोरोनाबाधितांसाठी बेडची मुबलक उपलब्धता : आरोग्य विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST2021-02-16T04:12:19+5:302021-02-16T04:12:19+5:30
पुणे : शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसह सर्वसाधारण बेड (खाटा) मुबलक प्रमाणात ...

कोरोनाबाधितांसाठी बेडची मुबलक उपलब्धता : आरोग्य विभाग
पुणे : शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसह सर्वसाधारण बेड (खाटा) मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. रूग्णालयातील बेडची माहिती विभागीय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर दररोज दर्शविली जात आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयांतील एकूण ४ हजार ४२६ बेड आजही कोविड-१९ च्या रुग्णांसाठी राखीव आहेत. यामध्ये सर्वसाधारण बेड १ हजार २४२, ऑक्सिजन बेड १ हजार ७०५, व्हेंटिलेटर बेड २१९, आयसीयू बेड १३३ इतकी आहे.
---------
बेड नाकारल्यास तक्रार करा
खासगी रुग्णालयांनी कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मध्यंतरी कोविड-१९ करिता राखीव बेड अन्य आजरांच्या रुग्णासाठी वापरण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार पालिकेने ही परवानगी दिली होती. मात्र कोरोनाचा प्रभाव वाढल्यावर पुन्हा हे बेड पालिकेला द्यावेत, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे कुठल्याही खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णास बेड नाकारल्यास लागलीच महापालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहन डॉ. नाईक यांनी केले आहे.
दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझर वापर करावा व गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.