शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी प्रेक्षकांमध्ये भाषाभिमानाचा अभाव : सुबोध भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:31 IST

ज्या मराठी माणसाने भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली. त्या भाषेतील चित्रपट 'या आणि पाहा' असे म्हणत प्रेक्षकांच्या भिका-यासारखा दारात उभा आहे.

ठळक मुद्देदक्षिणेकडच्या राज्यातील प्रेक्षकांच्या तुलनेत मराठी प्रेक्षकांमध्ये भाषभिमानाचा अभाव

पुणे : मराठी चित्रपटांना हिंदी आणि हॉलिवूडच्या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागत आहे. ज्या मराठी माणसाने भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली त्या भाषेतील चित्रपट 'या आणि पाहा' असे म्हणत भिका-यासारखा प्रेक्षकांच्या दारात उभा आहे. दक्षिणेकडच्या राज्यातील प्रेक्षकांच्या तुलनेत मराठी प्रेक्षकांमध्ये भाषभिमानाचा अभाव जाणवत असल्याची खंत प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे याने व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा उपक्रमात सुबोध भावे याच्याशी संवाद साधण्यात आला. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे आणि सरचिटणीस दिगंबर दराडे या वेळी उपस्थित होते. चित्रपट हे आधी मनोरंजनाचे माध्यम आहे. पण, सामाजिक विषयांची मांडणी करून त्याने प्रबोधन केले पाहिजे अशी अतिरिक्त जबाबदारी आपण विनाकारण मराठी चित्रपटांवर सोपविली आहे. मराठी माणसाशी आणि मातीशी नाळ जोडलेले विषय असतील तरच मराठी चित्रपट यशस्वी होतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला. 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने अमराठी भाषकांना अभिजात संगीत आणि नाट्यसंगीताची गोडी लावली. त्यामुळे चांगला चित्रपट अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट आहे. त्यांना चित्रपट पाहायचा असेल तर मराठीकडे वळावे लागेल,असेही त्याने स्पष्ट केले.'पुष्पक विमान' या चित्रपटाची कथा आणि निर्मिती माझी असून त्यात भूमिकादेखील करत आहे. 'चोटा चेतन'च्या धर्तीवर  बालचित्रपटाची निर्मिती आणि शंकर महादेवन यांच्यासमवेत एका चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे सुबोध भावे याने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSubodh Bhaveसुबोध भावे cinemaसिनेमा