शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोक्कातील फरार आरोपी पुण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 03:13 IST

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : चित्रपट पाहत असताना पकडले

पुणे : मोक्का गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी चित्रपट पाहाण्यात दंग असताना थेट चित्रपटगृहात जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले़ चित्रपटात शोभावी अशी ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी मंगला चित्रपटगृहात शुक्रवारी रात्री अकरा वाजता केली़उमेश भाऊसाहेब अरबळे (वय २६, रा़ इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल दरोडा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न व मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी उमेश अरबळे हा मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहात बसलेला आहे. त्याच्याविरोधात इचलकरंजी येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना फोनवरून दिली.व्हॉट्सअ‍ॅपच्या फोटोवरून पकडलेयासोबतच त्याचे फोटोही व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवले. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण इतर कर्मचाऱ्यांसह मंगला टॉकीज येथे गेले.टॉकीजच्या व्यवस्थापकाच्या मदतीने त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मिळालेल्या फोटोवरून त्याला स्क्रीन क्रमांक तीन येथून ताब्यात घेतले. याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना दिली. त्यानंतर त्याला इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी