‘सोमेश्वर’च्या अध्यक्षांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2015 04:21 IST2015-10-11T04:21:03+5:302015-10-11T04:21:03+5:30

सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालकांविरोधात बारामती येथील न्यायालयात दोन कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Abrukasani claims against Someshwar's president | ‘सोमेश्वर’च्या अध्यक्षांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

‘सोमेश्वर’च्या अध्यक्षांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालकांविरोधात बारामती येथील न्यायालयात दोन कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत शेतकरी कृती समितीचे प्रमुख सतीशराव काकडे यांनी तक्रार दिली.
‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचालक सुरेश तावरे यांनी संगनमताने ४ आॅगस्टला कारखान्याची साखर विक्री बंदची प्रेसनोट पत्रकारांना दिली. त्यामध्ये शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालयात साखर विक्रीला स्थगिती दिली, अशी खोटी बातमी प्रसिद्ध केली. त्यातून शेतकरी कृती समितीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. संचालक मंडळ स्वत:च्या चुका कृती समितीवर लादत आहे. कारखान्याच्या साखर विक्री बंदची मागणी शेतकरी कृती समितीची नव्हती. तरीदेखील कृती समितीची जाणीवपूर्वक बदनामी केली. त्यामुळे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २६ आॅक्टोबरला पहिली सुनावणी होणार आहे, असे काकडे यांनी नमूद केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Abrukasani claims against Someshwar's president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.