शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात गोळ्यांचे आॅनलाइन ‘दुकान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 20:43 IST

पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनने तसे औषध मागवून, शेड्यूल्ड ड्र्गजच्या नियमाला कसे धाब्यावर बसविले जाते हे उघड केले आहे.

ठळक मुद्देप्रिस्क्रीप्शन शिवाय वितरण : जिल्हा केमिस्ट संघटने मागविले आॅनलाईन किट, एफडीएकडे तक्रार आॅनलाईनद्वारे परराज्यातून गर्भपात औषधे सहज उपलब्ध डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय अशी औषधे घेतल्यास संबंधित महिलेच्या जीवावर बेतणार

पुणे : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रीप्शन) गर्भपात गोळ्या (एमटीपी किट) वितरीत करण्यास बंदी आहे. असे असताना काही आॅनलाईन संकेतस्थळावर डॉक्टरांची चिठ्ठी नसली तरी सर्रास औषधे दिली जात आहेत. पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनने तसे औषध मागवून, शेड्यूल्ड ड्र्गजच्या नियमाला कसे धाब्यावर बसविले जाते हे उघड केले आहे. त्याबाबत संघटनेने अन्न आणि औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार केली आहे.पुणे जिल्हा फार्मासिस्ट असोसिएशनचे सचिव विजय चेंगेडिया, प्रसन्न पाटील यांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. गर्भपातासारखी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नये असा अन्न आणि औषध प्रशासनाचा कायदा सांगतो. मात्र, त्यानंतरही आॅनलाईनच्या पळवाटेने गर्भपाताची औषधे सर्रास उपलब्ध होत आहेत. त्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही. केमिस्ट संघटनेने ओएमएसआयच्या संकेतस्थळावरुन ४९९ रुपयांचे हे किट वाहतुक खर्चासह अकराशे रुपयांत मिळविले आहे. चेंगेडिया म्हणाले, राज्यासह शहरात एमटीपी किट डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय दिले जात नाही. मात्र, आॅनलाईन मागविल्यास तुम्हाला डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज उरत नाही. आॅनलाईनद्वारे परराज्यातून गर्भपात औषधे सहज उपलब्ध होत आहेत. काही आॅनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या तर डॉक्टरांची चिठ्ठी देखील तयार करतात. त्यानुसार मागाल ते औषध मिळविण्याची सोय उपलब्ध झाली आहे. अशा कंपन्यांची ग्राहक सेवा केंद्र बेंगलोरला, फार्मासिस्ट मुंबईला, डॉक्टर म्हणून फोन येतो तो मुंबईवरुन अणि ग्राहक पुण्याचा अशी स्थिती असल्याचे चेंगेडिया म्हणाले. गर्भपाताची औषधे अशी उपलब्ध होत असल्याने समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय अशी औषधे घेतल्यास संबंधित महिलेच्या जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे गर्भपाताच्या औषधांचे आॅनलाईन वितरण बंद करावे अशी मागणी चेंगेडिया यांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरmedicineऔषधंonlineऑनलाइन