दमदाटी करून केला गर्भपात
By Admin | Updated: December 11, 2015 00:58 IST2015-12-11T00:58:55+5:302015-12-11T00:58:55+5:30
माहेराहून हुंडा आणण्यासाठी छळ करीत पती, दीर व सासूने मिळून दमदाटी करीत विवाहितेचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दमदाटी करून केला गर्भपात
पुणे : माहेराहून हुंडा आणण्यासाठी छळ करीत पती, दीर व सासूने मिळून दमदाटी करीत विवाहितेचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती व दिराला अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
प्रशांत हणमंत भोसले (वय ३०), प्रीतम हणमंत भोसले (वय २७, दोघेही रा. वाराणसी हौसिंग सोसायटी, वारजे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच, सुमन हणमंत भोसले (वय ५०) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहिणी प्रशांत भोसले (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. १७ जून ते २१ नोव्हेंबर या कालावधीत घडला. लग्नात आई-वडिलांनी मानपान केला नाही, सोने दिले नाही. आता माहेराहून १५ तोळे सोने व फ्रिज घेऊन ये, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच, मारहाणही करण्यात आली. तसेच घरच्यांच्या दबावामुळे लग्न केल्याचे सांगत पतीनेही त्यांचा छळ केला. फिर्यादी सात महिन्यांच्या गर्भवती असताना पतीने हे मूल आता आपणास नको आहे. तू गर्भपात करून घे, अन्यथा नांदवणार नाही, अशी दमदाटी केली. त्यांच्यावर दबाव आणून तिघा आरोपींनी जबरदस्तीने गर्भवात करून घेतला.