अभिषेक, आर्यन, श्रावणी उपांत्य फेरीत

By Admin | Updated: May 8, 2017 03:24 IST2017-05-08T03:24:55+5:302017-05-08T03:24:55+5:30

अभिषेक मांगले, आर्यन पंत, श्रावणी खावळे, साईना देशपांडे यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सोलारीस क्लब अखिल

Abhishek, Aryan and Shravani in the semifinals | अभिषेक, आर्यन, श्रावणी उपांत्य फेरीत

अभिषेक, आर्यन, श्रावणी उपांत्य फेरीत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अभिषेक मांगले, आर्यन पंत, श्रावणी खावळे, साईना देशपांडे यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सोलारीस क्लब अखिल भारतीय १६ वर्षांखालील टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मयूर कॉलनी येथील क्लबच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित अभिषेक मांगले याने पाचव्या मानांकित हर्षकुमार याचा ९-३ असा पराभव केला. आर्यन पंत याने रिशील जॉन याचा ९-१ असा सहज पराभव केला. चौथ्या मानांकित आर्यन बर्फीवाला याने सातव्या मानांकित अर्थव आमराळे याचा ९-१ असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित आश्विन भट याने सहाव्या मानांकित अक्षराज गुप्ता याचा ९-६ असा पराभव केला.
मुलींच्या गटामध्ये अग्रमानांकित कामया परब हिने आठव्या मानांकित कथा बिरमाने हिचा ९-१ असा पराभव केला. चौथ्या मानांकित पावनी पाठक हिने सायली जाधवचा ९-७ असा सहज पराभव केला. बिगरमानांकित साईना देशपांडे हिने तनिशा खान हिचा ९-२ असा तर, बिगरमानांकित श्रावणी खावळे हिने गार्गी हवालदार हिचा ९-० असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

Web Title: Abhishek, Aryan and Shravani in the semifinals