कसबा मतदारसंघात उमेदवार Bigg Boss फेम अभिजीत बिचुकलेंना एकूण किती मते पडली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:21 PM2023-03-02T13:21:09+5:302023-03-02T14:53:23+5:30

या निवडणुकीत आणखी एक असा उमेदवार उभा राहिला होता. जो महाराष्ट्रात कायम चर्चेत आहे.

Abhijit Bichukale of Bigg Boss fame, an independent candidate, got '38' votes in Kasba constituency | कसबा मतदारसंघात उमेदवार Bigg Boss फेम अभिजीत बिचुकलेंना एकूण किती मते पडली?

कसबा मतदारसंघात उमेदवार Bigg Boss फेम अभिजीत बिचुकलेंना एकूण किती मते पडली?

googlenewsNext

पुणे - कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होती. भाजपाने याठिकाणी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक लढवली. यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. 

या निवडणुकीत आणखी एक असा उमेदवार उभा राहिला होता. जो महाराष्ट्रात कायम चर्चेत आहे. हा उमेदवार म्हणजे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले. अभिजित बिचुकले यांनी कसबा पेठ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला होता. त्यात अभिजीत बिचुकलेंना ४७ मते पडली आहेत. अपक्ष उमेदवार आनंद दवे यांना २९६ मते पडली तर नोटाला १,३९७ मते पडली आहेत.

विजयानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया
रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर म्हटलं की, पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्वीकारलं नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे मी १०० टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. ५० खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतंय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर असल्याचं त्यांनी सांगितले. 

कसब्यात 'कमळ' कोमजलं
१९९२ ला कसब्यात पोटनिवडणूक झाली होती. त्यात काँग्रेस उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर २५ वर्षं गिरीश बापट आणि नंतर मुक्ता टिळकांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापूर्वी १९७८ ला अरविंद लेले निवडून आले, तेव्हापासून १९८५ ची निवडणूक आणि १९९१ची पोटनिवडणूक हा अपवाद वगळता मतदारसंघ भाजपकडेच होता. कसब्यातून गिरीश बापट पाच वेळा आमदार झाले होते. या निवडणुकीत भाजपने प्रथमच ब्राह्मणेतर उमेदवार दिला होता.
 

Web Title: Abhijit Bichukale of Bigg Boss fame, an independent candidate, got '38' votes in Kasba constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.